पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुका पोलिसांकडून एकूण ६४ वाहनांची मूळ मालकाच्या ताब्यामध्ये देऊन पोलीस स्टेशनला बऱ्याच दिवसापासून असलेल्या टू व्हीलर आणि फोर व्हीलर असे एकूण ६४वाहन मूळ मालकांना सुपूर्त नाम्यावर देण्यात आल्याची कारवाई करण्यात आली आहे
पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे बऱ्याच वर्षापासून प्रलंबित मुद्देमाल दुचाकी व चार चाकी वाहने मूळ मालकाचा शोध घेऊन सर्व पोलीस स्टेशनच्या आवारातील असलेले दुचाकी व चारचाकी वाहनांची तात्काळ निर्गती करण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी समक्ष पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनला भेट देऊन सर्व पोलीस स्टेशनला पडून असलेले दुचाकी व चारचाकी वाहनांची मूळ मालकांना बोलावून त्यांच्या निर्गती करण्याबाबत आदेश देण्यात आलेले होते.
त्या अनुषंगाने पंढरपूर तालुका पोलिसांनी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे अनेक वर्षांपासून अपघात, बेवारस मिळून आलेली व गुन्ह्यातील जमा असलेले दुचाकी व चारचाकी वाहनाच्या मूळ मालकांचा शोध घेऊन मूळ मालकांना पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे बोलावून त्यांच्याकडे गाडीच्या मालकी हक्काबाबत असलेले आरसी बुक व इतर कागदपत्राची पडताळणी करून एकूण ६४ वाहने त्यामध्ये अपघात व बेवारस इतर गुन्ह्यातील असे वाहने असून संबंधित मूळ मालकाला बोलावून त्यांच्याकडे बॉण्ड वरती सुपूर्तनामा करून सर्व वाहनांच्या मालकाचा शोध घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्याचप्रमाणे काही मालक कर्नाटकातून बोलावून त्यांना सदरची वाहने त्यांच्या ताब्यामध्ये देण्यात आलेली असून एकूण ४४ दुचाकी व २० चारचाकी अशी एकूण ६४ वाहने मूळ मालकांना सुपूर्त नाम्यावर देण्यात आलेली असून एकूण ६४ वाहनांची निर्गती करण्यात आलेली आहे
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर , उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पीएसआय भारत भोसले पीएसआय विक्रम वडणे ए एस आय विजय गायकवाड,दत्तात्रय तोंडले, पोलीस हेडकॉन्स्टेबल स्वप्निल वाडदेकर साजन भोसले श्रीमती मनेरी पोलीस कॉन्स्टेबल सागर गवळी विजयकुमार आवटी महिला पोलीस हवालदार कदम महिला पोलीस कॉन्स्टेबल ननवरे यांच्या पथकाने कारवाई केली आहे.