पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर शहर पोलीस ठाणे हददीत पंढरपुर शहरात मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेचे उद्देशाने मा. पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी ,अपर पोलीस अधिक्षक, प्रितमकुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, पंढरपूर उपविभाग पंढरपुर यांचे सुचनेनुसार व पंढरपुर शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांची विशेष पथके नेमुन पंढरपुर शहर व परिसरातील ज्या ठिकाणी मोटार सायकल चोरी जाणेचे प्रमाण जास्त आहे.
त्या ठिकाणचे घटनास्थळ निरीक्षण करून व त्यावर बारकाईने लक्ष ठेवुन गोपनीय बातमीदार यांचे मार्फतीने मोटार सायकली चोरीबाबतची माहिती काढणेचे काम सुरू असताना गोपनिय बातमीदाराकडुन एक बातमी मिळाली की, पंढरपुर शहरामध्ये बाहेर गावावरून काही आरोपी चोरी करण्या करीता येत आहेत त्यांची नावे १) गणेश बाळासोो जाधव रा जाधववाडी ता माळशिरस जि सोलापुर २) विकास महादेव पवार रा व्हावीरूई ता इंदापुर जि पुणे सध्या वाडी नं. २ माळशिरस जि सोलापुर ३) सुरज लाला पवार रा वालचंदनगर रोड कळंब ता इंदापुर ४) अतुल बाळु तुपे रा इंदिरा नगर कळंब ता इंदापुर जि पुणे ५) ओंकार अनंद वाघमोडे रा ६१ फाटा माळशिरस जि सोलापुर असे नावे कळाले वरून सदर आरोपी यांना विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्यांनी एकुण ०८ गुन्हयाची कबुली दिली आहे.
सदर आरोपींकडुन गुन्ह्याचा कौशल्यपुर्ण सखोल तपास केला असता आरोपींनी पंढरपुर शहर पोलीस ठाणेस दाखल असलेले भाग ५ गुरनं १) गुरनं ४७८/२०२४ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३०३ (२), २) गुरनं २३/२०२५ भा.न्या. सं.२०२३ चे कलम ३०३ (२), ३) गुरनं २५/२०२५ भा.न्या.सं.२०२३ चे कलम ३०३(२), ४) गुरनं ३१३/२०२५ भा.न्या.सं.२०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे, ५) गुरनं ४१८/२०२५ भा.न्या.सं.२०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे, ६) गुरनं ४२०/२०२५ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३०३ (२), ७) गुरनं ४२१/२०२५ भा.न्या. सं.२०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे ८) गुरनं ४२१/२०२५ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे पंढरपुर शहर पोलीस ठाणे येथे दाखल असलेले गुन्हे केल्याचे कबूली दिली आहे.
सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग डॉ. अर्जुन भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, पोह ३६४ पाटील, पोह ३९८ सिरमा गोडसे, पोह २२१ प्रसाद औटी, पोह १७८९ सचिन हेंबाडे, पोह १२५५ विठ्ठल विभुते, पोकों ३१ कपिल माने, पोकों १९०४ निलेश कांबळे, पोशि १२१६ शहाजी मंडले, पोशि २१९० समाधान माने, पोकों १५१३ बजरंग बिचुकले, पोकॉ १३०४ दिपक नवले, पोकॉ ८०१ धनाजी मुटकुळे तसेच सायबर शाखा सोलापुर ग्रामीण चे पोकॉ ११८२ रतन जाधव यांनी केली आहे.