धोंडेवाडी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील धोंडेवाडी येथे शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संस्थेच्या महत्त्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या रत्नाई कृषि महाविद्यालय अकलूज येथील चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या कृषि दुतानी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देत गावात प्रात्याक्षिक करून दाखवले.
महाविद्यालयाच्या वतीने येथे कृषि कार्यानुभव कार्यक्रम पुढील सहा महिने राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत कृषिदुतांनी गावातील शेतकरी बांधवांना आंब्याचे रोपटे देऊन सन्मानित केले. आणि शेतकरी बांधवांना पिकाच्या लागवडी पासून ते काढणीपर्यंत थोडक्यात, माहिती दिली.
यावेळी सहकार शिरोमणी वसंतदादा काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुरेश देठे, गोरख जाधव (उपसरपंच) महादेव देठे प्रगतशील बागायतदार, शहाजी देठे, माजी उपसरपंच ,शरद ताठे उपस्थित होते. आणि समस्त शेतकरी बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमास प्राचार्य आर. जी. नलावडे (प्राचार्य, रत्नाई कृषि महाविद्यालय अकलूज) एस एम एकतपुरे ( कार्यक्रम समन्वयक) व प्रा.एम. एम. चंदनकर ( कार्यक्रम अधिकारी) यांचे मार्गदर्शन लाभले.