मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पाचवीपर्यंत हिंदीची सक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात राज यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलेला आहे.
येत्या ५ जुलैला आंदोलन करण्याचा इशारा राज यांनी दुपारी पत्रकार परिषदेत दिला आहे. पण आता मोर्चाची तारीख बदलण्यात आलेली आहे. राज ठाकरेंची मनसे ५ जुलैला मोर्चा काढणार आहे. या मोर्चात अधिकाधिक मराठी जनांनी सहभागी व्हावं, असं आवाहन राज यांच्याकडून करण्यात आलेलं आहे.शालेय शिक्षणात हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात राज ठाकरेंची मनसे ७ जुलैला मोर्चा काढणार होती. गिरगाव चौपाटीवरुन त्यांचा मोर्चा निघणार आहे. पण आता मोर्चाची तारीख बदलण्यात आलेली आहे. मनसेचा मोर्चा ६ जुलैऐवजी ५ जुलैला निघेल. ६ जुलैला एकादशी आहे. त्यामुळे मोर्चाची तारीख बदलण्यात आलेली आहे. तर उद्धव ठाकरेंची शिवसेना ७ जुलैला आंदोलन करणार आहे. आझाद मैदानावर ठाकरेसेना आंदोलन करेल.
आज दुपारच्या सुमारास राज ठाकरेंनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शाळांमध्ये पाचवीपर्यंत हिंदी भाषा सक्ती विरोधात त्यांची भूमिका मांडली. 'भाषिक आणीबाणी आम्ही स्वीकारणार नाही. हिंदीची सक्ती लहान मुलांवर लादता येणार नाही. आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही. आम्हाला शिक्षण मंत्र्यांची भूमिका मान्य नाही. जोपर्यंत सक्ती मागे घेतली जात नाही, तोपर्यंत आंदोलन करु. या सक्तीला आमचा विरोध आहे,' असं राज ठाकरेंनी निक्षून सांगितलं.