पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
राज्याचे रोजगार हमी योजना,फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे सदस्य हभप ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर यांच्या हस्ते रोजगार हमी योजना मंत्री श्री गोगावले यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार राजू खरे, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.