मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
आश्वी खुर्द ता संगमनेर येथील लोकनेते डाॅ.बाळासाहेब विखे पा ( पद्मभूषन उपाधिने सन्मानीत ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालयात उपमुख्यध्यापीका सौ. अलका तांबे मॅडम , राज्यस्तरीय आदर्श ग्रंथपाल पुरस्कार प्राप्त श्री.उल्हास देव्हारे सर ,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपशिक्षक श्री. राजेंद्र चौधरी सर , माध्यमीकचे उपशिक्षक श्री. अनिलकुमार डांगे सर , विज्ञान परिचर श्री. बाळासाहेब वाबळे यांचा सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समितीचे अध्यक्ष श्री. आण्णासाहेब भोसले पाटील होते. , तर प्रमुख अतीथी संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे मॅडम व संचालक डाॅ.प्रदिप दिघे सर सर उपस्थीत होते, प्रथम अतीथी व सेवानिवृत्त होणा-या सेवकांच्या हस्ते पद्मश्री डाॅ. विठ्ठलराव विखे पा. व पद्मभूषन डाॅ. बाळासाहेब विखे पा. यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले, त्यानंतर प्रमुख अतीथीच्या शुभहस्ते सेवानिवृत्त कर्मचा-यांचा सत्कार करुन, सन्मानपत्र देउन गौरविण्यात आले.
"नियत वयोमानानुसार कर्मचारी सेवानिवृत्त होत असतातच, त्याच प्रमाणे आश्वी खुर्दच्या या शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांमुळे आजपर्यंत अनेक विद्यार्थी चांगल्या पदावर पोहचले, ग्रंथपाल देव्हारे सरांनी 'जाॅय ऑफ गिव्हिग' या मुंबई येथील सामाजीक संस्थेचा २०२५ चा , पारस व संवर्धिनी या संस्थांचे "राज्यस्तरीय आदर्श ग्रंथपाल पुरस्कार" मिळवुन संस्थेच्या व शाळेच्या नाव लौकीकात नेहमीच भर टाकली आहे, या पुढील त्यांचे आयुष्य आनंदी ,सुख समृद्धीचे व आरोग्यदायी जाओ हि साईचरणी प्रार्थना करते " असे मनोगत शिक्षण संचालिका सौ. सरोदे मॅडम यांनी व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्तवीक प्राचार्य श्री. सयराम शेळके सरांनी करून सर्वाचे स्वागत केले , पर्यवेक्षिका सौ.माधुरी सातपुते मॅडम यांनी सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या कार्याची माहिती दिली. सेवानिवृत्त होणा-या उपमुख्यध्यापीका सौ तांबे मॅडम , चौधरी सर , देव्हारे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करुन कृतज्ञता व्यक्त केली व सर्वाचे आभार मानले, सेवनिवृत्त कर्मचा-यांनी सी.ई.टी. पुस्तकांचा संच विद्यालयास संप्रेम भेट दिला. या कार्यक्रमास सरपंच सौ.अलका गायकवाड , बापुसाहेब गायकवाड पा , विठ्ठल वर्पे सर,डाॅ.दिनकर गायकवाड पा, मनीषा लुनीया ,डाॅ. बाळासाहेब आंधळे , संपत कुटे सर, मुस्ताक शेख सर, डाॅ. आण्णासाहेब तांबे सर, शंकर गाडेकर आदि ग्रामस्त,शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
सुत्रसंचलन सौ.मोना निचळ मॅम यांनी केले तर आभार सौ.अंजुम शेख मॅडम यांनी मानले.शेवटी विद्यार्थी व उपस्थीत सर्वांनी भोजनाचा स्वाद घेतला.