सातारा प्रतिनिधी तेज न्यूज
११ मे – महाराष्ट्र शिंपी समाज आयोजित १०७ वा शिंपी वधू-वर परिचय मेळावा सातारा येथे उत्साहात पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन सातारा जिल्हा नामदेव शिंपी समाज अध्यक्ष इंजि. सुनील पोरे, बाळ आंबेकर, नगरसेवक श्रीकांत आंबेकर, बाळासाहेब बाचल, सुधीर लंगडे, राधा बरटक्के, व शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
या कार्यक्रमाला सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सोलापूर, पुणे, नाशिक, अहमदनगर अशा विविध जिल्ह्यांतून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात सुमारे २०० वधू-वरांची नोंदणी झाली असून, त्यांच्यातील जुळवणीसाठी मेळाव्यात विशेष आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमामुळे विवाहाच्या योग्य जुळवणीस मदत होत असून, समाजातील तरुण-तरुणींना आपल्या अवाजवी अपेक्षांमध्ये न अडकता एकमेकांना समजून घेण्याची आणि योग्य जोडीदार निवडण्याची संधी मिळते, असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व सुसंगत पद्धतीने झाले असून, समाजातील सर्व थरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कार्यक्रम यशस्वितेसाठी रामचंद्र होमकर राजेंद्र भूतकर आदिनी परिश्रम घेतले