लक्ष्मी दहिवडी प्रतिनिधी तेज न्यूज प्रमोद बनसोडे
तीर्थ क्षेञ लक्ष्मी दहिवडी (ता. मंगळवेढा) येथे लक्ष्मी देवीची याञा असते याञेच्या कालावधीत भाविकांना उपलब्ध केलेल्या पाणपोई चे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ता निर्मला अहिरे यांचे हस्ते करण्यात आले असल्याची माहिती महात्मा फुले युवा मंच संस्थापक अध्यक्ष अनिल बनसोडे यांनी दिली.
याञेनिमित्त येणाऱ्या भाविकांना महात्मा फुले युवा मंच पाणपोई च्या माध्यमातून शुध्द पाणी उपलब्ध करून देते. यावर्षी या पाणपोईचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ता निर्मिला अहिरे यांचे हस्ते या पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.
यादरम्यान याञा कमिटी चेअरमन गंगाधर मसरे, आय टी बनसोडे, दत्तात्रय बनसोडे, विठ्ठल टाकळे, मच्छिंद्र बनसोडे, आर डी बनसोडे, राहूल टाकळे मेजर, किरण बनसोडे, अवधूत घोडके, स्वप्नील बनसोडे, राजेश तोडकरी, पप्पू स्वामी, सदाशिव कडलासकर, मधुकर लिगाडे, कुमार बनसोडे, मधुकर जुंदळे, लखन टाकळे मेजर, दिगंबर शिनगारे, नवनाथ बनसोडे, विनोद बनसोडे, वनेश चंदनशिवे, निलेश टाकळे, विद्याधर बनसोडे आदींसह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.