भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील भारत गॅस ग्राहकांनी
आपल्या गॅस कनेक्शनची केवायसी करणे आवश्यक आहे.तरच गॅस सिलिंडर मिळणार आहे.तरी सर्व भारत गॅस कनेक्शन धारकांनी तात्काळ केवायसी करावी असे आवाहन भारत गॅस चे वितरक विजय शिंदे यांनी केले आहे.
तुम्हाला गॅस चा लाभ मिळणे होणार बंद ताबडतोब हे करुन आपला गॅस चा लाभ सुरु ठेवा.शिवम भारत गॅस भाळवणी यांच्या अंतर्गत जे कनेक्शन धारक आहेत त्यांनी आपले कनेक्शन ज्यांच्या नावे आहे त्यांना भाळवणी गॅस ऑफिस मध्ये येऊन KYC करुन घेणे आवश्यक आहे.
तरच आपल्याला शासनाची सबशिडी व गॅस चा लाभ चालू राहील याची सर्व गॅस कनेक्शन धारकांनी नोंद घ्यावी.असे आव्हान विजय शिंदे यांनी केले आहे