पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये कोळा विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजने घवघवीत यश संपादन केले आहे. निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे अर्थशास्त्र या विषयामध्ये १०० पैकी 98 गुण मिळालेले आहेत.तब्बल ६ विद्यार्थ्यांनी ९० पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत.भूगोल विषयांमध्ये १४४ विद्यार्थ्यापैकी ११९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत.तर ९ विद्यार्थी ९० पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले असून ९६ गुणांचा प्रथम क्रमांक आहे.मराठी विषयात ४,सहकार व हिंदी विषयात प्रत्येकी २ तर इतिहास विषयात १ विद्यार्थी ९० पेक्षा जास्त गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाले आहेत.
कला शाखेचा १०० टक्के निकाल लागला असून यामध्ये प्रथम - कुमार संदेश सदाशिव चोरमुले 600 पैकी 536 - 89.33% गुण मिळवून केंद्रात प्रथम क्रमांक आला आहे.द्वितीय - कुमारी वैशाली बाबासो सरगर 600 पैकी 521 - 86.83%,तृतीय - कुमारी सुवर्णा पांडुरंग आलदर 600 पैकी 514 - 85.67% तर शास्त्र शाखेत प्रथम - कुमारी वर्षा बाळू शितोळे 600 पैकी 455 - 75.83%,द्वितीय - कुमारी ऐश्वर्या पांडुरंग कोळेकर 600 पैकी 442- 73.67%, तृतीय - कुमारी दिपाली सुखदेव मदने 600 पैकी 436- 72.67%
सदर विद्यार्थ्यांना प्रा.तानाजी सरगर आलदर, प्रा.आनंदा आलदर, प्रा.अमोल कोरे,प्रा.अंकुश सरगर , प्रा.मारूती श्रीराम,प्रा.महादेव गायकवाड,प्रा.सरताज तांबोळी,प्रा. रोहीणी शिंदे व प्रा.शुभांगी गयाळी यांनी सदर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, संस्था कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके,सर्व संस्था सदस्य,प्राचार्य श्रीकांत लांडगे, पर्यवेक्षक चारूदत्त जगताप,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.