पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस. के. एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर येथे सस्टेनेबल२८ इनोव्हेवेशन इन सिव्हिल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयातील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन २७ व २८ जून २०२५ रोजी करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यलयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
ही आंतरराष्ट्रीय परिषद युनिव्हर्सिटी ऑफ तारापाका, चिली; युनिव्हर्सिटी ऑफ अगदेर, नॉर्वे, क्यूशू, संगायो युनिव्हर्सिटी, जपान आणि सिंहगड इन्स्टिट्यूट, पुणे यांच्या संयुक्त सहकार्याने पंढरपूर येथे होणार आहे.
पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाने आतापर्यंत सात आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. सदर परिषदेत सादर होणारे शोधनिबंध प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय प्रकाशक स्प्रिंजर नेचरमध्ये प्रकाशित केले जाणार आहेत.
या परिषदेमध्ये मटेरियल, क्लीन एनर्जी, आर्टिफिशियल इंटीलिजीयन्स, इनोवेशन इन बिल्डिंग, जिओ टेक आणि इन्फ्रास्ट्रक्चर आणि ट्रान्सपोर्टेशन विषयातील सस्टेनेबल डेव्हलपमेंट विषयावरती विद्यार्थी, संशोधक विद्वान, शिक्षण तज्ञ, शास्त्रज्ञ शोध निबंध सादर करणार आहेत. याचा फायदा प्रामुख्याने संशोधन, शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण इत्यादी क्षेत्रात होणार आहे.
ही आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी करण्यासाठी कॉन्फरन्स चेअर म्हणून डॉ स्वानंद कुलकर्णी, डॉ. संपत देशमुख, सेक्रेटरी डॉ श्रीगणेश कदम, डॉ. श्याम कुलकर्णी, समन्वयक म्हणून डॉ. सत्यवान जगदाळे, श्री ओमकार बिडकर हे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहेत.