पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील सर्व ग्रामस्थांना कळविण्यात येते की ज्या कुटुंबांना राहण्यासाठी पक्के घर नाही अशा नागरिकांनी प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचा स्वतः Self Sarve (सेल्फ सर्व्हे) करावयाचा आहे.सदर सर्व्हेची मुदत दि-30/05/2025 पर्यंत आहे तरी लवकरात लवकर गरजू लाभार्थ्यांनी स्वतः सेल्फ सर्व्हे करून घ्यावा असे आवाहन सरपंच रणजीत जाधव यांनी केले आहे.
आपल्या Android मोबाईलवर Google Play Store उघडा.AwaasPlus 2024 शोधा आणि अॅप डाउनलोड करा. नंतर Aadhar Face RD हे ॲप डाऊनलोड करा.
2. अॅपमध्ये लॉगिन करा अॅप उघडल्यानंतर, आपला Aadhaar क्रमांक वापरून लॉगिन करा.चेहरा ओळख (Facial Recognition) वापरून प्रमाणीकरण आवश्यक आहे.
3. स्व-सर्वेक्षण फॉर्म भरा
"Add/Edit Survey" पर्याय निवडा.
आपली वैयक्तिक माहिती, कुटुंबातील सदस्यांची माहिती, सध्याच्या घराची स्थिती, उत्पन्न इत्यादी तपशील भरा.घराचे फोटो (यापूर्वी राहत असलेल्या कच्च्या घराचा फोटो आणि जर घरकुल मंजूर झाल्यानंतर ज्या जागेत बांधणार आहे त्या मोकळ्या जागेचा फोटो) अपलोड करा.
4. e-KYC पूर्ण करा
Aadhaar आधारित e-KYC व Job Card प्रमाणित करा.ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्वेक्षण ऑनलाईन अपलोड करा या ऑप्शन वर क्लिक करा.
या सेल्फ सर्व्हे ला मराठी भाषा उपलब्ध आहे.जर घरकुलाचा सेल्फ सर्व्हे करताना काही अडचणी आल्यास ग्रामपंचायतीला संपर्क करा. असे जाधव यांनी सांगितले आहे.