मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
जॉय ऑफ गिविंग सामाजिक संस्थेचा वर्धापन दिन येत्या ७ जून रोजी जोगेश्वरीच्या अस्मिता शाळेच्या राजपुरिया सभागृहात पहिल्या मान्यवर प्रमुख पाहुणे जोगेश्वरी भूषण डॉ एम डी वळंजू, अविनाश दौंड कामगार नेते, प्रदीप जोशी शिक्षकेतर कर्मचारी नेते, प्रिन्सिपॉल फादर निकी, जगदीश जायले वकील मुंबई उच्च न्यायालय, ॲड सिस्टर रुषिला रिबेलो, सेवानिवृत्त एसीपी वसंत ढोबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून यावेळी दादा पटवर्धन, जनार्दन जंगले, विश्वनाथ पंडित यांना त्यांच्या भरीव योगदानासाठी जीवनगौरव पुरस्कार तसेच विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या अनेकांना देखील पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष गणेश हिरवे यांनी कळविले आहे.
जॉय अनेक वर्षापासून समाजातील गोर गरीब वंचित विधार्थी, कामगार, वृद्ध यांच्यासाठी कार्यरत आहे.विशेष म्हणजे जॉय चे सभासद कार्यकर्ते आणि समाजात सामाजिक जाणीव असलेले देणगीदार यांच्या प्रयत्नाने वर्षभर विविध ठिकाणी मदत पोहचवित असतात.अधिक माहितीसाठी ९९२०५८१८७८ संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.