अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी प्रचारासाठी नादब्रह्म कला फाऊंडेशन आणि आरती साऊंड सिस्टीम पंढरपूर यांचा पुढाकार
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असलेली नादब्रह्म कला फाऊंडेशन करकंब, आरती साऊंड सिस्टीम पंढरपूर मनमाडकर परिवार तसेच पं.शौनक अभिषेकी यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपूर येथे मृदंगाचार्य कै.तात्यासाहेब मंगळवेढेकर आणि शंकराप्पा मंगळवेढेकर यांचे स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या संगीत महोत्सवात आंतरराष्ट्रीय किर्तीचे ख्यातनाम बासरीवादक पंडित रोणूजी मजुमदार गुरुजी यांचे बासरीवादन आणि रश्मी इचंगावकर यांचे शास्त्रीय गायन संपन्न झाले.सुरुवातीला मा. आमदार प्रशांतराव परिचारक ह.भ.प.शंकर महाराज बडवे, मिलिंद परिचारक,श्री.मोहन मंगळवेढेकर,ह.भ.प.निरंजन महाराज मनमाडकर,डॉ प्रसाद कुलकर्णी,भगवानभाऊ मनमाडकर, ज्ञानेश्वर दुधाणे शुभांगी ताई मनमाडकर आणि कलाकार रश्मी इचंगावकर -गंधे यांचे शुभहस्ते प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलन होऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी करत संगीत महोत्सव आयोजित करण्यामागचा उद्देश सांगत ग्रामीण भागातील कलाकारांशी भारतीय शास्त्रीय संगीत जोपासलं पाहिजे सांगत पंढरपूर ची लाडकी लेक सौ.रश्मी इचंगावकर -गंधे यांचे गायनाला सुरुवात झाली. त्यांनी राग केदार गात रसिक श्रोत्यांना अतिशय सुंदर शास्त्रीय संगीताची मेजवानी देत शेवटी ठुमरी आणि उड जाएगा हंस अकेला अप्रतिम रचना गायली .त्यांना तितकीच सुंदर साथसंगत तबला अभाजित बारटक्के हार्मोनियम श्रीरंग जाखी पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे टाळ वैभव केंगार यांनी केली.तर द्वितीय सत्रात आंतरराष्ट्रीय किर्तीचे ख्यातनाम बासरीवादक पंडित रोणूजी मजुमदार यांचे बासरीवादन आधी त्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आला त्यानिमित्ताने समस्त पंढरपूरकर कलारसाक कलासाधक यांचे वतीने आदरणीय प्रशांत मालक परिचारक यांचे शुभहस्ते सत्कार करण्यात आला.आणि बासरीवादनाला सुरुवात झाली.सुरूवातीला राग यमन कल्याण यामध्ये आलाप जोड झाला अप्रतिम सादर करत पंढरीच्या विठूराया चरणी आपली वादन सेवा रुजू केली.
त्यानंतर अतिशय सुंदर रुपक तालातील बंदीश आणि द्रुत तीनतालातील गत वाजवली.माझे माहेर पंढरी तसेच आनंदी मजुमदार यांनी पायोजी मैने राम रतन धन पायो अभंग सादर केला.त्यांना तितकच सुंदर साथसंगत तबला व्ही नरहरी, पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे,सह बासरी अथर्व भुमकर तानपुरा उदय भुमकर तर टाळ आनंदी मजुमदार यांनी करत कार्यक्रमाला रंगत आणली.यावेळी पंढरपूर आणि पंढरपूर पंचक्रोशीतील कलासाधक आणि कलारसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संकेत कुलकर्णी आणि आरतीताई मनमाडकर यांनी करत आभार मानले.यावेळी श्री सुपेकर आणि धनंजय मनमाडकर यांनी ध्वनी व्यवस्था सुंदर संभाळली होती यावेळी पंढरपूर आणि पंचक्रोशीतील कलासाधक आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.