सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
यातील संशयित आरोपी नामे महादेव यशवंत पवार, अमोगसिद्ध कुबेर पवार रा. मंद्रूप, तालुका दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर यांची मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश राणे यांनी विनयभंग केल्याप्रकरणी केलेल्या अपिलात हि निर्दोषत्व कायम केले आहे.
यात हकीकत अशी की, फिर्यादी हे सन २०१५ संध्याकाळच्या सुमारास आजारी असल्यामुळे मुलाला घेऊन दवाखान्यात जात होत्या. फिर्यादी कंदलगाव येथील दवाखान्यात त्यांच्या मुलाच्या गाडीवर निघाल्या होत्या. फिर्यादी हि सुभाष पवार यांचा शेताजवळ पोहोचले असता आरोपींनी गाडी आडवी लावून फिर्यादी व त्यांच्या मुलाला लाथाबुक्क्याने मारहाण केली. फिर्यादी यांच्या गावामध्ये पंचायत समितीची निवडणूक होती त्यावेळेस फिर्यादी यांचा मुलगा आरोपींच्या राजकीय विरोधकांकडे गेल्यामुळे आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मुलाला लाथाबुक्क्याने मारहाण केली होती. आरोपींनी फिर्यादीला मारहाण करून फिर्यादीचे कपडे फाडले व फिर्यादीच्या अंगाला झोम्बाझोम्बी केली. त्यामुळे फिर्यादीच्या मनास लज्जा वाटली. त्यानंतर फिर्यादीने सदर घडलेला प्रकार त्यांच्या पतीला सांगितला. त्याप्रमाणे आरोपी नामे महादेव यशवंत पवार, अमोगसिद्ध कुबेर पवार रा. मंद्रूप, तालुका दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर यांच्यावर भा.द.वि. कलम ३५४-ए, ३४१, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे मंद्रूप पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. सदर कामी पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र मा. न्यायालयात दाखल केले.
सदर प्रकरणात यातील संशयित आरोपी नामे महादेव यशवंत पवार, अमोगसिद्ध कुबेर पवार रा. मंद्रूप, तालुका दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर यांची मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. चव्हाण साहेब यांनी आरोपीचे वकील अँड. अभिजित इटकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून निर्दोष मुक्तता केली होती परंतु यातील फिर्यादीने सदर निर्दोषत्वविरुद्ध मा. सेशन कोर्टात अपील केले होते.
सदर अपिलात आरोपींतर्फे अँड. अभिजित इटकर यांनी मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिलेला निकाल हा आरोपींचे निर्दोषत्व सिद्ध करतो तसेच सदर केस हि बनावट व खोटी असल्याच्या युक्तिवाद केला. तसेच त्यापोटी अनेक उच्च न्यायालयाचे निवाडे सादर केले. सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. राणे साहेब यांनी सदर चे अपील फेटाळले.
यात आरोपींतर्फे अँड. अभिजित इटकर, अँड. गौरंग काकडे, अँड. शिवाजी कांबळे,अँड. राम शिंदे, अँड. संतोष आवळे, अँड. फैयाज शेख, अँड. सुमित लवटे, यांनी काम पाहिले.