भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या 894 व्या जयंतीनिमित्त वीरशैव लिंगायत समाज संघटना भाळवणी यांच्या वतीने दि. 30 एप्रिल 2025 बुधवार रोजी सकाळी 8 वाजता जगतज्योती महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर सकाळी 9 वा .प्रभूदेव शिवाचार्य माढेकर महाराज यांनी अनमोल असे आर्शीवचन , बसवेश्वरांचे विचार सांगितले. त्यानंतर 45 रक्तदात्यांनी रक्तदान केले .या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी भाळवणी गावचे युवा सरपंच रणजीत जाधव तसेच त्यांचे सहकारी ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री सचिन कुचेकर ,नवनाथ शिंदे , प्रविणराजे शिंदे ,हरिभाऊ शिंदे ,संजय बाबर, महादेव पवार , जिगर गायकवाड ,सुनीलराजे पाटील, निहाल शेख, सद्दाम सय्यद, वामनभाऊ सराटे- पाटील तसेच गार्डी व पळशी गावचे पदाधिकारी उपस्थित होते .
महात्मा बसवेश्वर यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी करून गावात एक आदर्श निर्माण केला आहे.डी जे नाही की मिरवणूक नाही. त्यामुळे या समाजाचा आदर्श घेऊन गावच्या रूढी परंपरा अबाधित राहणार आहेत. या समाजाने चांगला उपक्रम राबविला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
सायंकाळी 7 ते 9 या वेळेत बालशिवकीर्तनकार कुमारी शिवानी रामदास वसवते लोहगावकर यांचे सुमधुर असे शिवकीर्तन संपन्न झाले . या कार्यक्रमाच्या अखेरीला महाप्रसादा नंतर महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवाची सांगता झाली .
सदर जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी देशमुख ,जमदाडे कारंडे, विभुते, हिंगमिरे, लाकुळे , ढोले, तोडकर, भिंगे , नरोळे, राजमाने या परिवारातील तसेच समस्त लिंगायत परिवारातील स्त्री पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पाहुण्यांचे स्वागत महेश जमदाडे व गजेंद्र देशमुख यांनी केले तसेच प्रास्ताविक शशिकांत विभुते आणि दादासाहेब देशमुख यांनी मान्यवरांचे आभार मांडले .