सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
बहुप्रतिक्षित सोलापूर नागरी विमान सेवा अखेर येत्या ९ जून पासून सोलापूर गोवा या मार्गासाठी कंपनी सुरू करणार असल्याबाबतचा अधिकृत मेसेज कंपनीचे मार्केटिंग व्यवस्थापक आशुतोष चिटणीस यांनी सोलापूर विचार मंचच्या डॉ. संदीप आडके यांना आज संध्याकाळी पाठवून सोलापूर विचार मंचने सोलापूर होटगीरोड विमानतळातील अडथळे दूर करून येथून विमानसेवा सुरू करण्याबाबत जे अथक प्रयत्न केले आहेत व त्यांना सहकार्य केले आहे त्याबाबत आभार व्यक्त केले आहेत.
कंपनीच्या वेबसाईटवर २७ मे पासून सोलापूर ते गोवा व गोवा ते सोलापूर असे सोमवार, शुक्रवार, शनिवार ,रविवार या चार दिवसांचे वेळापत्रक व तिकिटांचे दर प्रकाशित करण्यात आले आहेत.
सोलापूर ते गोवा रु.२४७५/ व ५ टक्के जीएसटी असे आहेत.
*सोमवार व शुक्रवार*
गोवा. सोलापूर
7.20 8.30
सोलापूर गोवा
8.50 10.05
*शनिवार व रविवार*
गोवा. सोलापूर
16.05 17.10
सोलापूर. गोवा
17.35 18.50
सोलापुरातून होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू होण्यासाठी गेल्या पाच वर्षांमध्ये सोलापूर विचार मंचने होटगी रोड विमानतळातील प्रमुख अडथळा असलेली सिद्धेश्वर साखर कारखान्याची अनधिकृत चिमणी न्यायालयीन लढाई लढून १५ जून २०२३ रोजी काढली होती व पुढे फ्लाय ९१ या गोव्यातील कंपनीस येथून विमानसेवा सुरू करण्याबाबत आमंत्रण दिले होते .परंतु मध्ये काही तांत्रिक अडचणींमुळे दोन वेळा ही विमानसेवा रद्द झाली होती.
पण आता येत्या ९ जून रोजी विमानसेवा नक्की सुरू होईल अशी आशा सोलापूर विचार मंचचे व याचिका करते डॉ संदीप आडके यांनी दिली आहे व त्याबाबत फ्लाय ९१ कंपनीला येथून पुढे सुद्धा संपूर्ण सक्रिय राहून पाठिंबा देत राहतील असे त्यांनी कंपनीच्या व्यवस्थापनास आश्वासन दिलेले आहे.
यापुढे मुंबई ,हैदराबाद, बेंगलोर नवी दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद तिरुपती या ठिकाणी सुद्धा विमान सेवा सुरू करण्याचे इतर कंपन्यांबरोबर सोलापूर विचार मंचचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.