सांगोला प्रतिनिधी तेज न्यूज
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, सांगोला मधील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात सोमवार दिनांक १९ मे २०२५ रोजी सहा दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख प्रा. शिवानंद माळी यांनी दिली.
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च मधील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी उप-प्राचार्या डाॅ. विद्याराणी क्षीरसागर म्हणाल्या, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा कार्यशाळा आयोजित करण्यात अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय अशा कार्यशाळेचा लाभ विद्यार्थ्यांनी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. शिवानंद माळी मनोगत व्यक्त करताना म्हणाले, विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपले कौशल्य विकसित केले पाहिजे. असे मत त्यांनी व्यक्त केले.
ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. धनंजय शिवपुजे बोलताना म्हणाले, सिव्हिल इंजिनिअरिंग विभागामध्ये याप्रकारच्या कार्यशाळा विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी घेतल्या जातात.यादरम्यान प्रा. विशाल भाकरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित केले.
सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग आयोजित करण्यात आलेली कार्यशाळा ही १९ मे २४ मे २०२५ या कालावधीत संपन्न होणार असुन या कार्यशाळेत द्वितीय व तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
हि कार्यशाळा फॅबटेक एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, व्यवस्थापक प्रतिनिधी प्राजक्ता रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली असून ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारीवर्ग परीश्रम घेत आहेत.