केसकर वाडी प्रतिनिधी तेज न्यूज
केसकरवाडी येथे जगतज्योती, थोरसमाजसुधारक महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी करण्याचे आयोजन केसकरवाडी शिवनगर येथे करण्यात आले होते,
यावेळी प्रतिमापूजन एस टी महामंडळ अधिकारी म्हणून नुकतीच निवड झालेले प्रशांत चावरे यांच्या हस्ते करण्यात आले,
यावेळी वीरशैव लिंगायत युवा समाज संघटनेचे अध्यक्षपदी नंदकुमार लोखंडे यांची सर्वांनुमते यांची निवड करण्यात आली. खालील मंडळ त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन होणार आहे. यावेळी जयंती निमित्त सूत्रसंचालन नंदकुमार लोखंडे व हणमंत जमदाडे यांनी केले, बसवेश्वर महाराजांच्या इतिहास स्वप्निल जमदाडे यांनी सांगितला,
यावेळी एस टी महामंडळ मध्ये प्रशांत चावरे यांची निवड झाली म्हणून त्यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर माने यांनी केला.
यावेळी हरिदास जमदाडे, मल्लिकार्जुन चावरे, बजरंग डोंबे, मल्लकार्जुन डिकोळे, संजय जमदाडे ,उत्तरेश्वर लोखंडे ,रोहन लोखंडे ,बाळू गोटे ,प्रकाश गोटे, बाळासाहेब देशमुख ,भारत देशमुख ,रोहन लोखंडे, वैभव लोखंडे ,महेश जमदाडे, तुषार डिकोळे, डॉ.विजय चावरे,राहुल बुध्याळकर,अभिषेक चावरे, विशाल चावरे,दादा गोटे, दत्ता इंगळे, संदेश माने ,विक्रम शिंदे, रसूल शेख व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.