पहिल्या त्रैमासिक संगीत मैफिलीची सुरुवात आंतरराष्ट्रीय किर्तीच्या कलाकारांच्या उपस्थितीत रंगणार
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी प्रचारासाठी सदैव कार्यरत असणाऱ्या नादब्रह्म कला फाऊंडेशन करकंब.आरती साऊंड सिस्टीम पंढरपूर मनमाडकर परिवार यांचे वतीने आणि पं.शौनक अभिषेकी यांचे मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय किर्तीचे ख्यातनाम बासरीवादक पद्मश्री पं.रोणू मजुमदार यांचे बासरीवादन आणि रश्मी इचंगावकर यांचे शास्त्रीय गायन आयोजित करण्यात आले आहे .मृदंगाचार्य पं.तात्यासाहेब मंगळवेढेकर आणि पं.शंकराप्पा मंगळवेढेकर यांचे स्मृतीप्रीत्यर्थ एकदिवसीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी सांगितले.
वर्षातून पद्मश्री जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव आयोजित करीत असतानाच वर्षभरात नवोदित कलाकारांना नवीन व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी एक दिवसीय तीन कार्यक्रम जाहीर केल्या प्रमाणे पहिला कार्यक्रम शनिवार ३ में रोजी आरती प्रांगण भक्तीमार्ग श्रीक्षेत्र पंढरपूर येथे सायं ६:०० वाजता सुरू होणार आहे.त्या सर्व कलाकारांना साथसंगत तबला व्ही. नरहरी.ज्ञानेश्वर दुधाणे,अभिजित बारटक्के,श्रीरंग जाकी.करणार आहेत.
सदरहू कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असणार असून पंढरपूर आणि पंचक्रोशीतील कलासाधक आणि कलारसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक ज्ञानेश्वर दुधाणे आणि भगवानराव मनमाडकर यांचे वतीने करण्यात आले आहे.अधिक माहिती साठी संपर्क 9767776858 साधावा.