अमरावती प्रतिनिधी तेज न्यूज
आज रविवार दिनांक 27/04/2025 रोजी अमरावती येथे येथे संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकता विश्व महासंमेलन आयोजन समितीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला विदर्भ समाजाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या आपल्या बंधू-भगिनींना आणि पुण्यातील व्यापारी बंधू गणबोटे यांच्या हौतात्म्याला अश्रूपूर्ण मूक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष भास्कर रावजी टोम्पे, ईश्वरजी धिरडे, अनंत जंगजोड, विदर्भ टेलर सोसायटीचे अध्यक्ष राजू किटये साहेब, प्रदीप गंधे तसेच विदर्भातील सर्व जिल्हे व तालुक्यातील अधिकारी, माता भगिनी उपस्थित होते.अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र मुख संघटक संतोष मुळे यांनी दिली.