सातारा प्रतिनिधी तेज न्यूज
द्रोणा आर्चरी ॲकडमी , पनवेल आयोजित चौथी राज्यस्तरीय धनुर्विदया द्रोणा चषक स्पर्धा दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी पनवेल येथे संपन्न झाली.
या स्पर्धेमध्ये मिनी सब ज्युनिअर गटात ( वयोगट 15 वर्षे खालील) अर्णव माणिक मासाळ याने वैयक्तिक सुवर्ण पदक मिळविले.तसेच तो ज्या ॲकडमीमध्ये सराव करत आहे ती दृष्टी आर्चरी ॲकडमी,सातारा चौथ्या द्रोणा चषकाची मानकरी ठरली आहे भारतासाठी ऑलंपिकचे सुवर्ण पदक जिंकण्याचे त्याचे ध्येय आहे .
यासाठी तो सातत्याने सराव करीत आहे . तो जानेवारीमध्ये वरीष्ठ गटाची आंतरराष्ट्रीय निवड चाचणी पात्रता फेरी मिळविलेला देशातील सर्वात लहान वयाचा खेळाडू ठरला आहे. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक प्रविण सावंत व शिरिष ननवरे यांच्या मार्गदर्शना खाली धनुर्विद्येचे प्रशिक्षण घेत आहे. दृष्टी आर्चरीचे अध्यक्ष राजेश देशमुख , उपाध्यक्ष महेंद्र कदम व सचिव सायली सावंत यांनी अर्णवच्या या उज्ज्वल यशासाठी हार्दिक अभिनंदन केले.