भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील महादेव मंदिर ते दलाशी विहीर या रस्त्याचे भूमिपूजन सरपंच रणजीत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे हे होते.
यावेळी सरपंच रणजीत जाधव म्हणाले की,चेअरमन कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्यातून कावडी करिता महत्वाचा असणारा या रस्त्यास तात्काळ सहकार्य केले आहे.तसेच आपल्या गावचा सर्वात मोठा सण म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी गावातून कावड मिरवणुकीचा सण मोठया प्रमाणात साजरा केला जातो. या कावडीसाठी आवश्यक असणारे पाणी दलाशीच्या विहिरीतून आणून महादेव मंदिरास जलाभिषेक केला जातो. गावातील पाच कावडीच्या करिता रस्ता नव्हता.पण चेअरमन कल्याणराव काळे व पंचायत समिती सदस्य संभाजी शिंदे यांच्या सहकार्यातून या रस्त्याचे भूमिपूजन आज करण्यात आले आहे.त्यामुळे कावडीच्या भाविक भक्ताना पक्का रस्ता तयार करण्यात येणार आहे.असे जाधव म्हणाले.
यावेळी राजाराम लोखंडे, रंगनाथ लोखंडे, वसंत लाले, पोपट इंगोले,मधुकर गायकवाड, मुरलीधर लोखंडे, बाळासाहेब गायकवाड, गणेश गवळी, सोन्या शिंदे, सुरज गवळी, धनाजी लोखंडे, बाबासाहेब लोखंडे, सचिन लोखंडे, दीपक शिंदे, शिवाजी लोखंडे, दत्ता लोखंडे, बाळासाहेब लोखंडे, गुंडाप्पा चव्हाण, गणेश मोहिते, सचिन लोखंडे, रनजीत गवळी, सुनील पवार, विलास माने, बाबासाहेब गायकवाड, राजू शिंदे, हनुमंत लोखंडे, प्रसाद वाघमारे, सुनील पवार, अण्णा वाघमारे, चंद्रभागा कारखान्याचे अधिकारी शशिकांत सावंत,अरुण लोखंडे ,छोट्या पटेल, बाळू मुजावर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रवीण शिंदे यांनी मानले.