मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
महेश ढवळे यांची महाराष्ट्र शासनाने राज्य अन्न आयोग अध्यक्ष या पदावर पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे.
संदर्भ क्र.३ येथील शासन आदेश दि.१६.१२.२०२४ अन्वये, महेश ढवळे यांची सदस्य, राज्य अन्न आयोग या पदावर तात्पुरती नियुक्ती करुन त्यांच्याकडे अध्यक्ष, राज्य अन्न आयोग या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
महाराष्ट्र अन्न सुरक्षा अधिनियम (सुधारणा), २०२३, नियम ४ (२) व (३) अन्वये राज्य अन्न आयोगावर अध्यक्ष व सदस्य यांची पूर्णवेळ नियुक्ती करण्यासाठी वर्तमानपत्रामध्ये / विभागाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करून उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार शासनस्तरावर प्राप्त अर्जाची सचिव (अ.ना.पु. व ग्रा.सं.वि.) यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या छाननी समितीद्वारे छाननी करण्यात आली व समितीने छाननी केलेल्या पात्र उमेदवारांची सूची अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्तीसाठी राज्यशासनाकडे विचारार्थ सादर केली होती. त्यानुषंगाने राज्य अन्न आयोगावर पूर्णवेळ अध्यक्षांची नेमणूक करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
महेश ढवळे यांची महाराष्ट्र शासनाने राज्य अन्न आयोग अध्यक्ष या पदावर पूर्णवेळ नियुक्ती झाल्या बद्दल त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या जात आहेत.