सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
परिवर्तन संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी सचिन घाडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे असे नियुक्त पत्र संस्थापक अध्यक्ष ॲड.नेहा सुरेश दुबे यांनी नुकतेच घाडगे यांना दिले आहे.
यावेळी सचिन घाडगे म्हणाले की देशातील आणि राज्यातील सामान्य नागरिकांचे प्रश्न मी सोडवीन. संघटनेच्या माध्यमातून मी शासकीय योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचवणार आहे आणि सामान्य जनतेचे प्रश्न आणि अडचणी सोडविण्यासाठी मी कायमस्वरूपी प्रयत्न करेन.
या निवडीबद्दल सचिन घाडगे यांचे सर्व स्तरातून कौतुक करून अभिनंदन केले जात आहे.