भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
द्रोणा आर्चरी ॲकडमी , पनवेल आयोजित चौथी राज्यस्तरीय धनुर्विदया द्रोणा चषक स्पर्धा दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी पनवेल येथे संपन्न झाली होती.
या स्पर्धेमध्ये मिनी सब ज्युनिअर गटात ( वयोगट 15 वर्षे खालील) अर्णव माणिक मासाळ याने वैयक्तिक सुवर्ण पदक मिळविले.
यावेळी अर्णव मासाळ म्हणाला की, माझे भारतासाठी ऑलंपिकचे सुवर्ण पदक जिंकण्याचे ध्येय आहे . यासाठी मी सातत्याने सराव करीत आहे . मी जानेवारी मध्ये वरीष्ठ गटाची आंतरराष्ट्रीय निवड चाचणी पात्रता फेरी मिळविलेला देशातील सर्वात लहान वयाचा खेळाडू ठरला आहे. सध्या मी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक प्रविण सावंत व शिरिष ननवरे यांच्या मार्गदर्शना खाली धनुर्विद्येचे प्रशिक्षण घेत आहे.
यावेळी तेज न्यूज चॅनल चे संपादक प्रशांत माळवदे यांनी अर्णवचा शाल, श्रीफळ, पेन, डायरी,पेढे देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी पालक, भाळवणी येथील न्यू इंग्लिश स्कूल चे शिक्षक माणिक मासाळ उपस्थित होते. अर्णवच्या या उज्ज्वल यशासाठी अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.