विकासासाठी कटिबद्ध असलेल्या नेतृत्वाला संधी मिळाल्याने गावचा सर्वांगीण विकास निश्चित : नागेश फाटे
गादेगाव प्रतिनिधी तेज न्यूज
गादेगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सौ.सुनंदाताई शिवाजी बागल यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी–शरदचंद्र पवार पक्षाचे उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या हस्ते नुतन सरपंच सौ.बागल व त्यांच्या परिवाराचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी नागेश फाटे यांनी बागल परिवाराचे यांचे अभिनंदन करत, “बिनविरोध निवड ही गावाच्या एकतेचे व सौहार्दाचे प्रतिक आहे. सौ. सुनंदाताई बागल या एक अनुभवी, शांत आणि गावाच्या विकासासाठी कटिबद्ध नेतृत्व असून त्यांच्या कार्यकाळात गादेगावचा सर्वांगीण विकास निश्चित होईल,”असा विश्वास फाटे यांनी व्यक्त केला.
या यशामध्ये सौ.बागल यांचे चिरंजीव दत्तात्रय बागल यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी गावातील जनतेशी संवाद साधून विश्वास संपादन करत एकसंघ नेतृत्वाचे उत्तम उदाहरण निर्माण केले. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे तसेच गावातील ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र आल्याने ही बिनविरोध निवड शक्य झाल्याचे गौरवोद्गार उपस्थित मान्यवरांनी काढत ग्रामस्थांचे कौतुक केले.
या सत्कार समारंभाचे आयोजन अत्यंत साधेपणाने, पण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. यावेळी बागल कुटुंबीयांनीही गावच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहण्याचे आश्वासन दिले.
यावेळी महादेव बागल, भीमराव फाटे, मधुकर बागल, शशिकांत बागल, बाळासाहेब बागल, रवींद्र पाटील, सुभाष बागल, दत्तात्रय हुंडेकरी, शशिकांत आप्पा बागल, प्रदीप बागल, सिद्धनाथ बागल, गणेश बागल, समाधान नागणे, अनिल बागल, विनोद बागल, डॉ. रमेश फाटे, नवनाथ बागल, राजेंद्र मस्के, संजय कदम, सिद्धनाथ बागल व गादेगाव ग्रामस्थ उपस्थित होते.