पंढरपुर तालुक्यातील 95 ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण
दि.22 एप्रिलला सोडत
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील सन 2025-2030 या पंचवार्षिक कालावधीसाठी 95 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी दि.22 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता शेतकी भवन, पंचायत समिती पंढरपूर येथे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या सोडत कार्यक्रमासाठी तालुक्यातील इच्छुक सर्व नागरिकांनी हजर राहवे असे आवाहन तहसिलदार सचिन लंगुटे यांनी केले आहे.