पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
मा. प्रथम वर्ग, न्यायदंडाधिकारी , पंढरपूर कोर्ट यांनी आज दि. 03/04/2025 रोजी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 421/2021 भा.द.वि. कलम 354,323 वगैरे मधील आरोपी नामे दत्तात्रय चंद्रकांत पोरे रा. वाखरी, ता. पंढरपूर जि. सोलापूर यास भा.द.वि कलम 354 अन्वये दोषी धरून 2 वर्ष साधा कारावास व 4000 रुपये दंड, दंड न भरल्यास 3 महिने साधा कारावास व भा.द.वि कलम 323 अन्वये 6 महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
सदर केस मध्ये सरकारी वकिल याकुब .एम .मुल्ला व कोर्ट पैरवी म्हणून पोकॉ. विनोद माने यांनी काम पाहिले
सदर गुन्ह्याचा तपास ASI मारुती दिवसे व पोलीस नाईक अमोल कवले यांनी केला होता. IPS. अंजना कृष्णा vs (प्रभारी अधिकारी पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन) यांचे मार्गदर्शन लाभले.