पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सेवा हॉस्पिटल, ए बी इनामदार मेमोरीयल कॅन्सर सेंटर लायन्स क्लब पंढरपूर ड्रीम व लायन्स क्लब पंढरपूर तर्फे महिलादिना निमित्त गर्भाशय मुखाचा कॅन्सर व ब्रेस्ट कॅन्सरचे निदान शिबीर घेण्यात आले.
या शिबिराचे उदघाट्न सौ. विनया परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्लब सदस्या तसेच पंढरपूरच्या माजी नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले या होत्या.
कॅन्सरबदल, कॅन्सर होऊ नये म्हणून तसेच कॅन्सर झालाच तर काय करावे, कॅन्सरचे विविध प्रकार, व्यसनमुक्ती, निरोगी राहण्यासाठी आहार, विहार, व्यायाम, ताणविरहित राहण्यासाठी उपाय अशी विविधांगी माहिती सेवा हॉस्पिटलचे कॅन्सर तज्ञ तसेच कॅन्सर सेंटरचे सर्वेसर्वा लायन डॉ. अमित इनामदार यांनी आपल्या व्याख्यानामधे दिली. कॅन्सर ग्रस्त रुग्णांना समुपदेशन गरजेचे आहे हे ही सांगितले.
याच शिबिरामधे सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र भारतातील सर्वात लहान वयात Oncosurgeon (कर्करोगशस्त्रक्रिया तज्ञ)म्हणून पदवी मिळवलेले डॉ. प्रथमेश मलगोंडा यांचेही अमूल्य असे मार्गदर्शन शिबिरार्थीना लाभले.
या शिबिरामध्ये ७२ स्त्रियांनी आपली तपासणी करून घेतली. सर्व तपासण्या महिला टेक्निशियन यांनी केल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ. साधना भोसले यांनी दोन्ही लायन्स क्लब व इनामदार सरांच्या कार्याविषयी समाधान व्यक्त करून प्रोत्साहन दिले.
उदघाटक सौ. विनया परिचारक यांनीही अतिशय उपयोगी व स्तुत्य असा उपक्रम असल्याबद्दलचे मत व्यक्त करून कॅन्सर तज्ञाना आपल्या काही शंका तसेच माहितीही विचारली. ज्यातून बरीचशी जादा माहिती शिबिरार्थीना मिळाली.
शिबिरासाठी लायन्स ड्रीमचे अध्यक्ष ला. डॉ. मंदार सोनवणे,सचिवा ला. कृतांजली सावंत, ला. योगिता वसेकर उपस्थित होते तर लायन्स पंढरपूरचे प्रशासक तसेच रिजन 1 चे झोन चेअरमन ला. विवेक परदेशी, ला. सुरेखा कुलकर्णी, ला. डॉ. अश्विनी परदेशी व बरेच लायन सदस्य उपस्थित होते.
सेवा हॉस्पिटलचा अतिशय कार्यकुशल स्टाफ, ला. तेजश्री भायगुडे, ला. स्मिता अधटराव व विश्वनाथ आळगे यांनी शिबीरासाठी परिश्रम घेतले.
शिबिराचे सूत्रसंचालन लायन्स ड्रीमच्या प्रशासक ला. ललिता कोळवले यांनी केले तर आभार प्रदर्शन ला. डॉ. अश्विनी परदेशी यांनी केले.