लक्ष्मी दहिवडी प्रतिनिधी तेज न्यूज
लक्ष्मी दहिवडी (ता. मंगळवेढा) येथील ग्रामपंचायत कार्यालयात ८ मार्च २०२५ रोजी महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी १० वाजता विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस महिला ग्रामपंचायत सदस्यांची अनुपस्थित दिसुन आली. महिला दिनानिमित्त ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन स्वाती कडलासकर यांच्या हस्ते पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
सरपंच अनिल यांच्या हस्ते उपस्थित महिलांचा शाल, फेटा, हार व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास कृषी सहाय्यक श्रीमती कोरे सी डी, स्वाती कडलासकर, गीतांजली वाघमारे, अंगणवाडी महिला मनिषा वाघमारे, सुप्रिया वाघमारे, लता ईश्वर बनसोडे, शोभा बनसोडे आदींसह अनेक महिलांचा यावेळेस ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात युवा नेते किशोर वाघमारे, मोहन वाघमारे, विजय दादा आदलिंगे, अविनाश वाघमारे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गंगाधर मसरे, मनोहर लिगाडे, प्रमोदराजे बनसोडे, दादा गायकवाड, दिगंबर शिनगारे, गणेश बनसोडे, एकनाथ कडलासकर, अमोल सोनवले आदींसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.