पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे तेज न्यूज
पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये अनुलोम चे वस्ती मित्र आणि आरोग्य दूत म्हणून रात्री अपरात्री रुग्णांना मदत करणारे अजित खिलारे यांच्या प्रयत्नामुळे प्रथमच दुर्बिणी द्वारे संदेश कांबळे ( अनुलोम मित्र) राहणार ,संत पेठ पंढरपूर या रुग्णावर तुटलेल्या गुडघ्यांच्या शिरांची शस्त्रक्रिया सोलापूर चे सुप्रसिद्ध आर्थ्रोस्कोपी तज्ञ डॉ. विवेक देगावकर (एमबीबीएस एमएस ऑर्थो ) यांनी अतिशय दुर्मिळ आणि गुंतागुंतीची असणारी शत्रक्रिया मोफत यशस्वी रित्या महात्मा जन आरोग्य योजने अंतर्गत भूलतज्ञ डॉ. अभिजित पाटील यांच्या सहाय्याने पार पडली .
ही शस्त्रक्रिया बाहेर खाजगी रुग्णालयात केली असती तर सुमारे 1 लाख रुपये खर्च आला असता,आपल्या अजित खिलारे मुळे विना खर्च शस्त्रक्रिया पार पडली ,यावेळी आपले अनुलोम मित्र नागेश कुंभार यांचे चिरंजीव गणेश कुंभार हे यावेळी उपस्थित होते
या वेळी कॉटेज हॉस्पिटल चे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुडके यांची भाग जनसेवक रामेश्वर कोरे यांनी अजित खिलारे यांचे समवेत भेट घेऊन पथ्यपाणी वगैरे चर्चा केली,डॉ. सूडके यांनी ही सर्व माहिती दिली