कोल्हापूर प्रतिनिधी तेज न्यूज
अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर या चित्रपटाचे पोस्टर व रिलीज डेट लॉन्चिंग जेजुरी गडावर करण्यात आली.
ह्या सोहळ्याच्या वेळी प्रमुख उपस्थिती अभिनेत्री अश्विनी महांगडे दिग्दर्शक सुशांत सोनवले निर्माते सोमा शिंदे व संपूर्ण चित्रपट टीम उपस्थित होती.
धर्मा आणि धर्म रक्षणासाठी लढा देणारा इतिहास दाखवणारा चित्रपट येत्या 23 मे ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. तर सर्वांनी हा चित्रपट बघण्याचे आवाहन रसिक मायबापांना टीमच्या वतीने केले आहे.