पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादी महिला पदाधिकारी तसेच पंढरपूर शहरातील महिला पदाधिकारी यांनी पंढरपूर बस स्थानक हे नेहमी अस्वच्छ असते. त्याचबरोबर पंढरपूर बस स्थानकामध्ये महिलांच्या सुरक्षेतेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे अनेक वेळा संबंधित बस स्थानकातील अधिकारी वर्गांना वेळोवेळी सूचना देऊनही पंढरपूरचे बस स्थानक नेहमी अस्वच्छ व दुर्गंधी असते.
पंढरपूर बस स्थानकातील संबंधित कर्मचाऱ्यांच्या निषेधार्थ तालुक्यातील व शहरातील महिला पदाधिकाऱ्यांनी उद्या शुक्रवार दिनांक 21 मार्च 2025 रोजी सकाळी 9 वाजता पंढरपूरच्या बस स्थानकामध्ये मध्यवर्ती प्रवेशाच्या ठिकाणी कंट्रोल केबिनच्या पाठीमागे शहरातील व तालुक्यातील महिला पदाधिकारी आमरण उपोषणास बसणार आहेत. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी पंढरपूर तालुका अध्यक्षा राजश्री ताड यांनी दिली आहे.
तरी पंढरपूर तालुक्यातील व शहरातील सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांची सकाळी 9 वाजता पंढरपूर शहर बस स्थानकामध्ये उपस्थिती प्रार्थनीय आहे. असे आव्हान राजश्री ताड यांनी केले आहे.