अकलूज प्रतिनिधी संजय निंबाळकर तेज न्यूज
वेळापूर उपविभागातील शाखा कार्यालय बोंडले येथे अकलूज विभागाचे कार्यकारी अभियंता अण्णासाहेब काळे , सेक्शन चे शाखाधिकारी आनंद भोई साहेब व लाईनमन बंडू कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली जनमित्र ज्ञानेश्वर बागल ( खळवे ) यांनी त्यांच्याकडे असलेल्या कार्यक्षेत्रातील खळवे गावची R C I ग्राहकांची चालू बिलासह पुर्ण थकबाकी वसुल करून खळवे गाव सलग दोन वर्ष निरंक थकबाकी मुक्त केले.
त्याबद्दल त्यांचे शाखा कार्यालय बोडले तर्फे सर्वांचा सत्कार केला.सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.