शेळवे प्रतिनिधी तेज न्यूज
शेळवे तालुका पंढरपूर येथील प्रशालेचा मा. विद्यार्थी श्री स्वामी विभीषण आसबे याची नुकत्याच झालेल्या एमपीएससी परीक्षेद्वारे सहाय्यक महसूल विभागात महसूल सहाय्यक आणि असिस्टंट टॅक्स ऑफिसर या पदावर नियुक्ती झाली... तसेच प्रशालेचा मा. विद्यार्थी ज्ञानेश्वर शशिकांत साळुंखे याची मुंबई पोलीस म्हणून निवड झाल्याबद्दल प्रशालेमध्ये त्यांचा सत्कार आयोजित केला होता... तसेच प्रशालेचे गुणवंत विद्यार्थी ज्यांनी एन एम एम एस सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार आयोजित केला होता.
यावेळेस या संस्थेचे सचिव सागर गाजरे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब गाजरे, शिक्षणप्रेमी आप्पासाहेब भोसले, बाळासाहेब गाजरे, अशोक साळुंखे, विठ्ठल ताठे, संजय गाजरे, दिलिप गाजरे, विजय गाजरे, प्रशांत नागटिळक,शितल पवार,सौ. बनसोडे, माता पालक तसेच गावातील व पंचक्रोशीतील समस्त नागरिक, विध्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे संचालक सागर गाजरे यांनी आपल्या मनोगतात प्रशालेने तसेच सर्व शिक्षकांनी केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर शिक्षक प्रतिनिधी शहाजी गोफणे यांनी मनोगत व्यक्त केले.
त्याचबरोबर स्वामी आसबे तसेच ज्ञानेश्वर साळुंखे यांनी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रशालेचे मुख्याध्यापक शामराव पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनाने मंत्रमुग्ध केले. सदर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी कृषी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हिरीरीने सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील नागणे , प्रास्ताविक ज्योतीराम गायकवाड यांनी केले.