पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
जल्लोष शिवजयंतीचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून बोपखेल भागात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) आणि शिव मल्हार स्थापना समिती यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्व जनसामान्यांच्या घरात पोहचावी या हेतूने ५१ महाराजांच्या मुर्ती देऊन मोठ्या जल्लोषात महाराजांची जयंती साजरी करण्यात आली- श्री भाग्यदेव घुले
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, व्यापार, अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर तसेच जेष्ठ, युवक, शिवप्रेमींना बोलवण्यात आले होते कार्यक्रमाच्या दरम्यान गुरूवर्य सोपान वाजे सर संजय सुपे सर तसेच प्राध्यापक मनोज वाखारे सर राजेश दरेकर साहेब महिला आघाडीच्या मंगलाताई घुले यांनी मोलाचे मार्गदर्शन आणि साजरी करण्यात आलेल्या शिवजयंती चे कौतुक केले. आयोजकांनी बोपखेल गावातील बाल खेळाडूंचा (लाठी-काठी, तलवार चालवणारे विद्यार्थी) शिवमुर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
दिघी गावच्या कन्या *कुमारी प्रियांका ताई इंगळे* महिला *खो-खो* विश्वचषक विजेत्या *टीम इंडियाच्या कर्णधार* यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली होती त्यां चेही शिवमुर्ती, शाल, पुष्प गुच्छ देऊन बोपखेल गावातील विविध मान्यवरांच्या हस्ते मान सन्मान करण्यात आला.
ताईंनी ही त्यांचे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे स्वरूप पाहून त्यांनीही आयोजकांचे स्तुती केली.
कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भोसरी शहराचे उपशहरप्रमुख श्री राहूल गवळी पिंपरी विधानसभा प्रमुख श्री तुषार नवले, भोसरी लांडेवाडी विभागाचे शिवसेनेचे शाखाप्रमुख श्री विशाल भाऊ चव्हाण, दापोडी गावचे नाथाभाऊ, प्रमोदभाऊ, कु प्रतिक्षाताई घुले जिल्हाप्रमुख, युवतीसेना, श्री रविंद्र कोवे विभागप्रमुख शिवसेना श्री नवनाथ घुले उपविभाग प्रमुख शिवसेना), श्री यशवंत कदम उपशाखाप्रमुख श्री सागर गिरी, श्री अमोल देवकर युवा नेते शिवसेना श्री केशव वाघमारे उपस्थितीत होते. आदरणीय राहूल गवळी, श्री तुषारभाऊ नवले, कु मंगलाताई घुले यांनी त्यांच्या मार्मिक शब्दांत त्यांचे विचार मांडले.
कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, पोलिस पाटील श्री पांडुरंग घुले व पुरोहित श्री संदिप तात्या चिटणीस (भावकी-गावकी) ग्रामस्थ शिवसेना आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक, शिवमल्हार समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय सुपे (सर) यांनी केले.सदरील कार्यक्रमांचे आयोजन श्री भाग्यदेव घुले युवा नेते शिवसेना आणि श्री संतोष गायकवाड शिवसेना शाखाप्रमुख ह्यांनी केले होते