पं.राजा काळे.पं.ओजस आदीया.पं.अमर ओक.अपर्णा केळकर यांची उपस्थिती लाभणार
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे मनमाडकर परिवार आणि ज्ञानेश्वर दुधाणे नादब्रह्म कला फाऊंडेशन करकंब यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला दोन दिवसीय संगीत महोत्सवाचे हे तिसरे वर्ष असून शनिवार रविवार दिनांक १-२मार्च २०२५ रोजी आरती प्रांगण भक्तीमार्ग श्रीक्षेत्र पंढरपूर येथे सायंकाळी ५:३० वाजता आयोजित करण्यात आला असल्याचे संयोजक ज्ञानेश्वर दुधाणे आणि भगवानराव मनमाडकर यांनी सांगितले.
यावेळी प्रमुख उद्घाटक मा.आमदार प्रशांतराव परिचारक.आळंदी देवस्थान चे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथजी पं.शौनक अभिषेकी असणार असून भारतीय लोकसंगीत भारुड या संगीत क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या चंदाताई तिवाडी यांना कै. पुष्पा कै.नारायण पंढरीनाथ दुधाणे स्मृती संगीत सेवा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून दोन दिवशीय संगीत महोत्सवामध्ये शनिवार दिनांक १ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय किर्तीच्या ख्यातनाम गायिका अपर्णाताई केळकर यांचे शास्त्रीय गायन आणि द्वितीय सत्रात आंतरराष्ट्रीय किर्तीचे ख्यातनाम तबलावादक ओजस आदीया मुंबई यांचे तबला एकलवादन संपन्न होणार आहे.
रविवार दिनांक २ मार्च रोजी पहिल्या सत्रात आंतरराष्ट्रीय किर्तीचे ख्यातनाम बासरीवादक अमर ओक यांचे बासरीवादन आणि द्वितीय सत्रात अभिषेकी बुवांचे जेष्ठ शिष्य पं.राजा काळे यांचे शास्त्रीय गायनाने महोत्सवाची सांगता होणार असून या सर्वांना पांडुरंग पवार अमेय बिच्चू. कौशिक केळकर,उदय कुलकर्णी कौशिक केळकर कृष्णा साळुंखे ,ज्ञानेश्वर दुधाणे आदी कलाकार साथसंगत करणार आहेत.ध्वनीव्यवस्था आरती साऊंड सिस्टीम यांची असणार आहे.दोन दिवशीय संगीत महोत्सव विनामूल्य असून श्री क्षेत्र पंढरपूर व पंचक्रोशीतील सर्व कलारसिक व कलासाधकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नादब्रह्म कला फाऊंडेशनचे ज्ञानेश्वर दुधाणे यांचे वतीने करण्यात आले आहे.
यासाठी विशेष सहकार्य लोकमान्य मल्टीपर्पज बॅक.फॅबटेक मल्टीस्टेट बॅक.ज्ञानप्रसाद अकॅडमी,यांचे अनमोल सहकार्य लाभले असून महोत्सव यशस्वी करण्यासाठी पं.शौनक अभिषेकी अभेद अभिषेकी भगवानराव मनमाडकर ज्ञानेश्वर दुधाणे धनंजय मनमाडकर शुभांगी ताई मनमाडकर देवकी दुधाणे संकेत कुलकर्णी माधूरी जोशी.गौरी अमळनेरकर करण देवगांवकर.डॉ प्रसाद कुलकर्णी.वैभव केंगार.माऊली खरात.सुदर्शन कुंभार शिवराज पंडीत,महिला संगीत भिशीच्या सर्व महिला आदी अधिक परिश्रम घेत आहेत अधिक माहिती साठी संपर्क 09767776858 करावा.