तिसंगी प्रतिनिधी तेज न्यूज
तिसंगी पाटी ते तिसंगी तालुका पंढरपूर या साडेपाच मीटर रुंद व अडीच किलोमीटर लांब रस्त्याचे डांबरीकरण कामाची सुरुवात आज मा जिल्हा परिषद व जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या शोभाताई तानाजी वाघमोडे देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सोलापूर जिल्ह्याचे मा. आमदार पांडुरंग परिवाराचे नेते प्रशांतराव परिचारक व मा. आमदार शहाजीबापू पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून सदरचे काम मंजूर करण्यात आले होते.
सदर रस्त्यासाठी 2 कोटी रुपये मंजूर असून चांगल्या दर्जाचे काम करनार असल्याचे ठेकेदार दत्ता सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितले. सदर रस्त्यामुळे भाळवणी , भंडीशेगाव सुपली ,पळशी, सोनके भागातून सांगोल्याकडे जाणारी वाहतूक वाढणार असून वेळही वाचणार आहे.
माजी सरपंच तानाजी वाघमोडे देशमुख मा.सरपंच मोहनभाऊ रुपनर, सरपंच बाळासाहेब आहेरकर मोहम्मद मुलानी व इतर यावेळी उपस्थित होते.