पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
युवप्रवर्तक छ.शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंती निमित्त राणाप्रताप ग्रुप पंढरपूर यांच्या वतीने "शिवगौरव पुरस्कार" वितरण समारंभ व "शिवजयंती घरगुती सजावट स्पर्धेचा" बक्षीस वितरण समारंभ पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प प्रभाकर दादा बोधले तर हा कार्यक्रम पुणे शिक्षण संचालक विभागाचे निरीक्षक . रावसाहेब मिरगणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रमुख उपस्थिती नगरपरिषदेचे माजी मुख्याधिकारी सुनील वाळूजकर व पंढरपुरातील जेष्ठ नाट्यकर्मी कलासाधना सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक श्रीकांत बडवे महाजन हे होते.
या कार्यक्रमाचे स्वागत डॉ. आनंद शिंदे यांनी केले तर मागील नऊ वर्षापासून राणा प्रताप ग्रुपचे सुरू असलेले कार्य प्रस्ताविकामधून संस्थापक प्रताप चव्हाण सर यांनी विषद केले. शिवगौरव पुरस्काराचे मानकरी जेष्ठ इतिहासकार गोपाळराव देशमुख,डॉ. बजरंग धोत्रे,श्री.गजेंद्र पवार सर,डॉ.पंकज गायकवाड,श्री.लक्ष्मीप्रसाद मोहिते सर,आदर्श संस्था म्हणून योग विद्याधामचे श्री.ननवरे सर हे व्यासपिठावर उपस्थित होते. परिक्षकांच्या मनोगतातून श्री.शहाजीराव देशमुख सर यांनी परीक्षकांना आलेले अनुभव व्यक्त केले. मान्यवरांचा व पुरस्कार विजेत्यांचा परिचय मंदार केसकर व सचिन कदम यांनी करून दिला.
आपल्या मनोगतामधून प्रभाकर बोधले महाराजांनी शिवकार्याची प्रेरणा युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी राणा प्रताप ग्रुपचे धन्यवाद मानले तर श्री.रावसाहेब मिरगणे यांनी राणा प्रताप ग्रुपच्या कार्याचे कौतुक केले.
सर्वच मान्यवरांनी या कार्याला शुभेच्छा दिल्या.आभार प्राचार्य प्रशांत पाटील सर यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ.सचिन लादे यांनी केले.कार्यक्रम पार पाडण्यासाठी राणा प्रताप ग्रुपचे महेश भोसले सर, ज्ञानेश्वर मोरे सर,ज्ञानेश्वर गवळी,माऊली निकते, रविराज सोनार,किशोर मोळक,रविकांत कदम, सोमनाथ माने,घनश्याम धुमाळ,दिगंबर गडम, कैलास कारंडे ,बाबासो शिंगण, सचिन लोळगे, सतिश चंद्रराव सर,बालाजी फूगारे,अमित वाडेकर सर,तुकाराम खंदाडे सर,डॉ.प्रशांत ठाकरे सर,अमरसिंह चव्हाण सर यांनी परिश्रम घेतले तसेच या कार्यक्रमासाठी शिक्षण, आरोग्य,अध्यात्म व सर्व क्षेत्रामधील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.