पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज पंढरपूर तालुकयातील धोंडेवाडी वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्था धोंडेवाडी येथे वसंतराव (दादा) काळे यांच्या 81 जयंतीनिमित्त सोलर एक्यूमेंट ग्रीन एनर्जी सोल्युशन चे डायरेक्टर अभिजीत बेके सर रिनेव्हेबल एनर्जी सोलर या विषयावर व्याख्यान पर मार्गदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित संस्थेचे अध्यक्ष कल्याणराव काळे हे होते.
यावेळी काळे यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की विद्यार्थ्यांनी काळाची पावले ओळखून आपल्या क्षेत्रात स्किल संपादन करून स्वतःचा सर्वांगीण विकास केला पाहिजे.
यावेळी अभिजीत बेके यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना सोलर एनर्जी, सोलर प्लेट, सिलिकॉन धातू,सेल याविषयी सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थीचा प्रश्नाचे उत्तरे देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवला. एम.मॅटिक आटोमेशन सोल्युशन च्या डायरेक्टर मनिजा वाडेर यांनी ऑटोमेशनचे महत्व पटवून दिले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयटीआय कॉलेजचे प्राचार्य संतोष गुळवे यांनी केले संस्थेच्या विकासात्मक धोरणाची माहिती सांगून येणाऱ्या काळाची गरज ओळखून वसंतराव काळे आयटीआय मध्ये सोलर टेक्निशन या कोर्सची सुरुवात केली आहे या कोर्सच्या ग्रामीण भागातील मुलांनी स्वतःचा व्यवसाय निर्माण करून देण्याची संधी दिली आहे असे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि अनिल ननवरे यांनी केले. यावेळी संस्थचे सचिव चंद्रकांत कुंभार, अजय बेके ,अर्जुन बापू जाधव, सुरेश काळे, व सर्व निदेशक वर्ग उपस्थित होते.