सातारा प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील अप्पर जिल्हाधिकारी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दिलेल्या सूचना नुसार रोडवर भीक मागणारी, वेश्या व्यवसाय करणारे, दुर्धर आजार आशा लाभार्थ्यांना तातडीने सातारा जिल्ह्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सूचनेचे पालन करून अशा लाभार्थ्यांना राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांच्या हस्ते अंत्योदय शिधापत्रिका वितरित करण्यात आली.
याबाबत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील लाभार्थी अशा लाभापासून वंचित राहणार नाही व कोणीही उपाशी झोपणार नाही याबाबतच्या विश्वास सर्व संबंधित अधिकारी यांनी अध्यक्ष महेश ढवळे यांना दिला.
यावेळी सातारा जिल्ह्यातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी सर्व रेशन दुकानदार व संबंधित अधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन ढवळे यांनी केले.