पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर तीन वर एक अनोळखी पुरुश मयत झाला आहे. सदर मयत व्यक्तीबाबत माहिती असल्यास सबंधितांनी रेल्वे पोलीसांशी संपर्क साधवा असे, आवाहन पंढरपूर रेल्वे पोलीसांनी केले आहे .
अनोळखी व्यक्तीचे वय अंदाजे 35 वर्षे असून , उंची 170 से.मी, अंगाने सडपातळ, रंग काळा-सावळा, केस काळे, चेहरा उभट, नाक सरळ, अंगावर काळ्या रंगाची पांढऱ्या पट्ट्याची ट्रॅक पॅन्ट व काळ्या रंगाचा टी शर्ट असे मयत व्यक्तीचे वर्णन आहे. संबधीतांनी तसेच ओळखीच्या व्यक्तीने याबाबत पंढरपूर लोहमार्ग पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे .