सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
भारतीय संविधान 75 वर्ष पूर्ती व जागतिक महिला दिन निमित्त महिलांसाठी राज्यस्तरीय भाकरी भाकरी बनविण्याची स्पर्धा कमीत कमी वेळेत गोल,पातळ, तीळ लावून 75 बाजरी भाकरी बनविणाऱ्या महिलांना मिळणार 22 हजारांची बक्षीस रोख रक्कम दिली जाईल.
(स्पर्धेसाठी बाजरीचे पीठ,शेगडी,चूल, संयोजक व्यवस्था करतील)
पहिले बक्षीस रोख 7500 रुपये,दुसरे बक्षीस रोख 5500 रुपये,तिसरे बक्षीस रोख 3500 रुपये पूर्ण आहेर,चौथे बक्षीस रोख 1500 रुपये,पाचवे बक्षीस रोख 750 रुपये,उतेजनार्थ 6 ते 15 क्रमांकासाठी 201 रुपये बक्षीस देण्यात येणार आहेत.
ड्रीम फौंडेशन,जिजाऊ भाकरी केंद्र उद्योग समूह,जय हिंद करियर अकॅडमी आयोजित बाजरी भाकरी बनविण्याची स्पर्धा घेतल्या जातील.शनिवार व रविवार दि 1 व 2 मार्च 2025 वेळ स 11 ते सायं 5 वा स्थळ श्री सिध्देश्वर भोजनालय सभागृह. श्री मारुती मंगल कार्यालय शेजारी ओम गर्जना चौक जुळे सोलापूर येथे स्पर्धा घेण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी संयोजक संगिता भतगुणकी मो 8484952020 स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणीसाठी संपर्क सतीश पाटील मो 7219099955 जिजाऊ भाकरी केंद्र मो 8275728388 समन्वयक काशिनाथ भतगुणकी मो 9890948388 यांना संपर्क साधावा.