जोगेश्वरी प्रतिनिधी तेज न्यूज उदय वाघवणकर
जोगेश्वरी (पुर्व) येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मनपा रुग्णालयातील असूविधांमुळे नागरिक त्रस्त आहेत.
दिनांक - २१ फेब्रुवारी रोजी या रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील डॉक्टर अनुपस्थित असल्याने वैद्यकीय अधिक्षकांनी यामुळे होणारी रुग्णांची गैरसोय बघता याबाबत जोगेश्वरी पोलीस स्टेशनमध्ये अत्यावश्यक सेवा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासंबंधीचे पत्र दिले आहे.
त्यामुळे या कंत्राटदारावर नियमानुसार कारवाई होणे अपेक्षित असून त्याला पुन्हा कंत्राट मिळणार नाही याची सुद्धा खबरदारी घेणे गरजेचे आहे.