पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याला घडवण्यासाठी स्वतःची जबाबदारी ओळखून आपल्या पाल्याबरोबर वर्तन करावे पाल्य हे पालकांचे अनुकरण करत असतात तेव्हा आपले वर्तन आदर्श ठेवावे तरच आपले पाल्य जीवनामध्ये सुसंस्कारी घडतील, यशस्वी होतील असे प्रतिपादन सोलापूर येथील प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक आय.आय. मुजावर यांनी व्यक्त केले श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या प्रशाले तर्फे आयोजित केलेल्या पालकांसाठी मार्गदर्शन शिबिरामध्ये आयोजित केलेल्या रखुमाई सभागृह येथे ते बोलत होते.
यावेळी संस्थेचेअध्यक्ष डॉ. मदन क्षीरसागर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सहसचिव अजित नडगिरे उपस्थित होते.
प्राचार्य डॉ मुंढे यु.आर.यांनी प्रास्ताविक व स्वागतामध्ये प्रशालेतील विविध सुविधा व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केल्या जात असणाऱ्या सर्व उपक्रमांची माहिती दिली. यावेळी प्रशालेतील वरिष्ठ लेखनिक हनुमंत मोरे, जेष्ठ शिक्षक श्री विलास दराडे, अशोक पवार , नानासाहेब देवकते, अमोल हुंगे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी खूप मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होते त्यांनी या कार्यक्रमाचे प्रशालेचे संस्थेचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजूभाई मुलाणी यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते