सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
दि 26 येथील वीरशैव महा-जन सभा ट्रस्ट संचलित ब ना बिराजदार वसतीगृहात भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थाध्यक्ष श्री मल्लिनाथ विभूते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
प्रारंभी भारतमाता महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस मान्यवरांकडून पुष्पहार अर्पण करण्यात आले!या प्रसंगी सरचिटणीस बाबासाहेब कुलकर्णी कोषाध्यक्ष विजयकुमार थळंगे अधिक्षक सोमेश्वर लवंगे ट्रस्टी राजेंद्र कोठवळे प्रा शरणबसप्पा मंगळूरे आदि मान्यवर उपस्थित होते ध्वजारोहणानंतर वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली!सचिव कुलकर्णी यानी उपस्थितांचे स्वागत करून प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देऊन या दिनाचे महत्त्व स्पष्ट केले प्रा मंगळूरे सर यानी या वसतीगृहात राहून शिक्षण पूर्ण केल्याचे सांगून म्हणाले शिक्षणाने जीवन बदलून जाते!दहावी बारावीनंतर पुढील शिक्षण घेताना शिक्षकांचे मार्गदर्शन घ्यावेत! चांगले शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहा!राजेंद्र कोठावळे यानी राष्ट्रहित राष्ट्रप्रेम महत्त्व स्पष्ट करून म्हणाले आपापसात प्रेम सदभावना वाढवून भारतीय संविधानाचे महत्त्व
समजावून घेऊन त्याचे परिपालन करावेत!उद्याचे आदर्श नागरिक तुम्हीच आहात!हे लक्षात ठेवा!अध्यक्षिय भाषणात श्री मल्लिनाथ विभूते यानी विद्यार्थ्यांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन प्रगतीशील भारताची संस्कृती महान असल्याचे सांगून म्हणाले ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना संस्था निवास व भोजनाची सोय करीत आहे!संस्था 116व्या वर्षांत वाटचाल करत आहे!
या प्रसंगी विरेश कल्याणशेट्टी संजय शटगार विनय ठिसके या विद्यार्थ्यांचा त्यानी विविध महाविद्यालयात मिळविलेल्या यशाबद्दल अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आले!कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन श्री सोमेश्वर लवंगे यानी केले!