मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज उदय वाघवणकर
दिनांक ०३ जानेवारी रोजी भारताच्या पहिल्या शिक्षिका राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती पश्चिम रेल्वेच्या अखिल भारतीय ओबीसी रेल्वे कर्मचारी संघटनेच्या स्टेशन बिल्डिंग ऑफिसमध्ये थाटामाटात आणि उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ओबीसीचे विभागीय अध्यक्ष रामनाथ पाटील, विशेष उपस्थितीमध्ये एससी/एसटीचे जीएलओचे अध्यक्ष धर्मेंद्र पिपिल, ओबीसी मुंबई विभागाचे सचिव सुरेश बारापत्रे, लोअर परळ कार्यशाळेचे विभागीय सचिव संजय मडवे, विनायक म्हात्रे, सचिव महालक्ष्मी ओबीसीचे सचिव प्रमोद बाउल, सूरज विभुटे, युनियन आणि मुख्य कार्यालयाचे युनियन पदाधिकारी सरदार भगत, अभय आणि सर्व ओबीसीचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन विभागीय कार्यकारी अध्यक्ष आणि जी. एल. ओ. चे सचिव अमर बहादूर पटेल यांनी केले.सर्व वक्त्यांनी राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांचे जीवन आणि कार्य यावर विस्ताराने भाष्य केले.त्याचवेळी सर्वांनी एकमताने क्रांतीसूर्या ज्योतिराव फुले आणि राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी केली.