सांगली प्रतिनिधी तेज न्यूज
वानलेसवाडी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वानलेसवाडी व सौ.व्ही .बी. धनवडे प्राथमिक शाळा वानलेसवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेमध्ये आज 11 जाने. 2025 रोजी आठवडी बाजार संपन्न झाला.आठवडी बाजार ही संकल्पना आमच्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक जाधव यांच्या नियोजनाखाली ,मार्गदर्शनाखाली पार पडली.
विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान समजावे. ,नफा तोटा , गणिती क्रिया बेरीज, वजाबाकी या संकल्पना स्पष्ट व्हावी.आजचे व्यापारी उद्याचे भावी उद्योजक होतील ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून आठवडी बाजार शाळेमध्ये भरवण्यात आला .या कार्यक्रमासाठी वाळवा तालुका बौद्ध सोसायटी चे विद्यमान सचिव मा.विवेक( भाऊ) धनवडे साहेब त्याने आठवडी बाजाराचे उद्घाटन केले .व त्याच बरोबर शाळेतील पालक एक प्रगतशील शेतकरी, इसापुरे यांनी आठवडी बाजाराचे उद्घाटन केले.सर्व शिक्षक ,शिक्षक इतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन दळवी मॅडमनी केले इयत्ता पहिली ते सातवी मधील 150 विक्रेत्याने यामध्ये भाग घेण्यात आला होता.वानलेसवाडी ,कुंभारमळा समतानगर, लक्ष्मीनगर , दुर्गानगर बेथेलहेमनगर परिसरातील पालकांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेऊन बाजाराचा आनंद घेतला व बाजार खरेदी केला .या आठवडी बाजारामुळे पालकांमध्ये समाधानाचं ,आनंदाचं वातावरण निर्माण झाले. इ. 1 ली ते 12 मधील , सर्व वर्गशिक्षकांनी ,शिक्षकांनी हा आठवडा बाजार यशस्वी करण्यासाठी योगदान दिले .