म्हसवड प्रतिनिधी तेज न्यूज
म्हसवड येथे सिटी मॉल या कापड दुकानाचे उद्घाटन २६ जानेवारी रोजी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते आणि इंजि. सुनील पोरे (नासप जिल्हाध्यक्ष) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या व्यवसायाची स्थापना १९४० साली विजयशेठ चांडवले यांच्या आजोबांनी केली होती, आणि आता पाचवी पिढी या व्यवसायात कार्यरत आहे.
उद्घाटनाच्या कार्यक्रमाला नासप राज्य अध्यक्ष संजय नेवासकर, सचिव डॉ. अजय फुटाणे, नितीन दोशी, युवराज सुर्यवंशी, करण भैय्या पोरे, दत्ता भागवत, डॉ. दोलताडे, विक्रम जाधव, सौ. सुवर्णा पोरे, मॉडर्न स्कूलच्या पवार , सदाशिव सावंत, नारायण मासाळ, नामदेव चांडवले तसेच पंचक्रोशीतील महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिटी मॉलमध्ये माल थेट फॅक्टरीकडून ग्राहकांपर्यंत उपलब्ध करून दिला जाणार असून, त्यामुळे ग्राहकांना किफायतशीर दरात चांगल्या प्रतीचे कापड मिळेल.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश म्हेत्रे यांनी तर आभार प्रदर्शन राणी चांडवले यांनी मानले.